विविध आकाराचे एकूण १६ कलागारे दादासाहेब फाळके चित्रनगरीमध्ये असून ते चित्रपट,दूरदर्शन आणी जाहीरात निर्मात्यांच्या गरजा पूर्ण करतात.

- दादासाहेब फाळके चित्रनगरी ही सर्वाधिक कलागारे असलेली संस्था आहे.
- आपल्याला दादासाहेब फाळके चित्रनगरीत काहीही चित्रीकरण करायचे असेल तर आपल्यासाठी जागा उपलब्ध आहे.बहुविध सुविधांसह कलागारे,
- एक लाख चौरस फुटापेक्षा कलागारांचे क्षेत्रफळ .
- आपणांस आपले भव्य सेट उभारण्यास प्रोत्साहीत करणारे एकूण १६ वातानुकुलीन तसेच वातानुकुलीन यंत्रणे रहित विविध आकारमानात ५० फुट लांबीपासून,४० फुट ते २६० फुट रुंद ,२५ फुट ते ७५ फुट उंचीचे.

बहुतांशी चित्रीकरण स्थळांशी व कलागारांशी सलंग्न असे ८५ रंगभूषा कक्ष,वास्तव्य कक्ष,वेशभूषा कक्ष इ.

भारतातील बहुविध देखाव्यांची एकमेव लक्षणीय इमारत. ही इमारत तीन वेगवेगळ्या बाजूंनी वेगवेगळे देखावे चित्रीकरणासाठी उपलब्ध करून देते उदा.जेल,कोर्ट,पोलीस स्टेशन,चर्च,चाळ इ.