मुंबईच्या गोरेगांव (पूर्व) उपनगरात ५२० एकरापेक्षा जास्त जागेवर चित्रनगरी प्रकल्प वसलेला आहे.हा प्रकल्प गर्दीपासून दूर असून आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय विमानतळापासून सहज पोहचण्याजोगा आहे.

या रमणीय परिसरात ४० बाह्य चित्रीकरण स्थळे असून अनेक किलोमीटर्सच्या गर्द हिरव्यागार वृक्षराजीने वेढलेली आहेत. नैसर्गिक डोंगर,टेकड्या,जंगल ठिकठिकाणी पसरलेले असून लगतच विहार,पवई तलाव आहेत.तसेच एक कृत्रिम तलाव आहे.एवढा सुंदर परिसर ज्यामध्ये बागबगीचे,घनदाट जंगल, डोंगर,दऱ्या,हेलीपॅड,विस्तीर्ण पटांगण व सुमारे ८ कि,मी.चे WBM रस्ते आहेत असा परिसर कदाचित दुसऱ्या कुठल्याही कलागारे संकुलात उपलब्ध नसावा.

दादासाहेब फाळके चित्र नगरीने सन १९७७ मध्ये दोन कलागारांनी सुरुवात करून आजमितीस विविध आकाराचे १६ वातानुकुलीत ध्वनीविरोधक कलागारे आहेत.सर्व कलागारांना अद्ययावत प्रसाधन कक्ष आहेत.

दादासाहेब फाळके चित्रनगरीतील हेलीपेंड ( पूर्ण क्षमतेने कार्यान्वित ) हे सर्वात उंचीवर असल्यामुळे बहुविध दिशांनी चित्रीकरणासाठी स्वयंभू चित्रकरणस्थळ आहे. दऱ्या ,टेकड्या,खंडाळा,घाट ,पूल,इ.विशेषत्वाने आकर्षित करणारे चित्रीकरण स्थळे आहेत.

वरील चित्रीकरण स्थळांशिवाय ,येथे देऊळ, चर्च ,न्यायालय,पोलिस स्टेशन,कारागृह,चाळ ,एटीएम सेंटर,बाजार, लाकडी झोपडी, आदिवासी खेडे, विहुविध देखाव्यांची इमारत जसे कौलेज, रुग्णालय,वसतिगृह इ.अशी काही कायमस्वरूपी चित्रिकरण स्थळे निर्माण केली आहेत.चित्रपट निर्मात्यांच्या तातडीच्या गरजा भागविण्यासाठी उपहारगृह, कॅंफेटेरिया,स्वच्छतागृहे व स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम उपलब्ध आहे.

दादासाहेब फाळके चित्रनगरी रिलायन्स मिडिया वर्क्स (भूतपूर्व अेडलेंब) यांच्या सहकार्याने महामंडळ जागतिक दर्जाची कलर फिल्म प्रोसेसिंग, तेथील दर्जेदार व कुशल कर्मचाऱ्यांच्याद्वारे जागतिक दर्जाची सेवा देत आहे.रिलायन्स मिडिया वर्क्स हे Digital Intermediates DI व Telecine सुविधाही देत आहे. तसेच व्हीसलींग वूड्स इंटरनेशनल ही संस्था , अभिनय दिग्दर्शन, संगीत , संकलन ,चित्रकथा लेखन,कल्पना रेखाटन (Animation) व करमणूक व्यवसाय इ.विषय येथे शिकविल्या जातात.