दादासाहेब फाळके चित्रनगरीमध्ये चित्रीकरणाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ५२० एकर एवढी विस्तीर्ण जागा मुंबईच्या उपनगरात आहे .

दादासाहेब फाळके चित्रनगरीकडे ४० पेक्षा अधिक बाह्य चित्रीकरण स्थळे आहेत.

दादासाहेब फाळके चित्रनगरीमध्ये नैसर्गिक नामनिर्देशित केलेले स्थळे असून त्यात डोंगर,दऱ्या ,खोरे ,पठारे ,नैसर्गिक जंगल,झाडी,पाणथळ यांचा समावेश आहे. मुंबईच्या विस्त्रीर्ण बांधकाम क्षेत्रात मध्यवर्ती ठिकाणी दादासाहेब फाळके चित्रनगरी हे नैसर्गिकपणा जपलेले एक रत्न आहे.

उपजत नैसर्गिक सौंदर्याबरोबरच दादासाहेब फाळके चित्रनगरीने काही बाह्य चित्रीकरण स्थळे जसे, देऊळ,हेलीपॅड,मैदान,तलाव,धरण,बंगला,बगीचा,पूल तयार केले असून येथील वातावरण गर्दीपासून दूर आहे.

येथील शांतता व सौंदर्य बाह्य चित्रीकरण करू इच्छीणाऱ्या निर्मात्यांना आकर्षित करतात.

मुंबईत दादासाहेब फाळके चित्रनगरी खेरीज कुठल्याही चित्रीकरण संकुलात वेगवेगळे असे नैसर्गिक चित्रीकरण स्थळे उपलब्ध नाहीत.