दादासाहेब फाळके चित्रनगरी. जेथे दिवसा उजेडी तारे पहायला मिळतात , जेथे सूर्य मावळतो पण उजेड कधीच मावळत नाही. हे जग आपल्याला आपली कल्पना शक्ती कसोटीवर उतरवू देते.आणि नंतर आपण आपल्या विचारांचा वेध घेऊ शकता.

दादासाहेब फाळके चित्रनगरी. भारतीय चित्रपट उद्योगातील सर्वात जास्त कलागारे असलेले मोहित करणारे गांव. ५०० एकर जागेच्या ताकदीवर दरवर्षी सुमारे १०० चित्रपट झळकतात.कल्पित किंवा वलयांकित, सत्य घटना किंवा कल्पित कथा ,नृत्य किंवा नाटक , आपण कुठलाही पर्याय निवडून कॅंमेऱ्यासमोर ठेऊ शकता, आमच्याकडील विविध आकाराच्या १६ अधयावत कलागारांपैकी निवड करून आपण आपला विषय प्रत्यक्षात उतरवू शकता, "बर्निंग ट्रेन " पासून " देवदास " पर्यंत," चाणक्य " पासून " कौन बनेगा करोडपती " पर्यंतचा चित्रनगरीचा प्रवास हे प्रगतीचे घोतक आहे. पवई व विहार तलावांच्या सानिध्यात बहुविध बुद्धिमत्तेची,बहुविध स्थळांची,बहुवूध प्रसंगांची सर्वकाही जादुई दुनिया येथे वसलेली आहे.

भारतीय तसेच जागतिक कलागुणांसाठी दादासाहेब फाळके चित्रनगरी,४० बाह्यचित्रीकरण स्थळांसह मुंबईत वसलेली आहे. येथे चित्रित झालेल्या निर्मितीमध्ये गुंतागुतीचे कथानक, गूढ मांडणी ,रडविणाऱ्या दु:खद घटना,खुसखुशीत विनोद त्याच बरोबर एकमार्गी पण उच्च दर्जाची करमणूकप्रधान निर्मिती इ.बाबी प्रत्येक निर्मितीमध्ये लहान व मोठ्या पडदयावर गाजलेल्या आहेत.

दादासाहेब फाळके चित्रनगरी, मुंबई, नमस्ते