अधिसंघ संस्थापन लेख आणि संस्थापन नियमावाली  येथे क्लिक करा...

चित्रनगरी बाबत
मुंबई चित्रनगरी. एक आश्चर्याचे जग ! असे जग जेथे आपण आपली कल्पनाशक्तीची कसोटी घेऊ शकता व आपल्या विचारांचा वेध घेऊ शकता.भारतीय चित्रपट उद्योग  हा जगातील एक सर्वात मोठा चित्रपट उद्योग असून भारतात निर्मिती होणाऱ्या चित्रपटांपैकी ६० टक्के वाटा मुंबई चित्रपट उद्योगाचा आहे.

गेल्या शंभर वर्षामध्ये भारतातील चित्रपट उद्योग अत्यंत दॄत गतीने वाढला आहे व त्यामध्ये विस्मयजनक त्रांत्रिक बदल घडलेले आहेत.

आता भारतीय चित्रपट उद्योग हा व्यावसायिकता,जागतिकीकरण, आणि खात्रीलायक आंतरराष्ट्रीय स्वारस्याकडे वाटचाल करीत आहे. 

या चित्रपट उद्योगाच्या वाढीस गती देण्यासाठी आम्ही प्रदूषण विरहीत पायाभूत सुविधा चित्रीकरणासाठी तयार केल्या आहेत ज्या योगे आपल्या चित्रपट निर्मितीच्या इच्छाशक्तीस चालना मिळेल.

भारतातील मुंबईत गोरेगांव येथे एकत्रित कलागारे संकुल उभारण्यात आले आहे.यामध्ये काही ध्वनिमुद्नन कक्ष,बागबगीचे,तलाव,चित्रपटगृह,मैदान इ.चा समावेश असून याचा बॉलीवूड  मधील अनेक चित्रपटांच्या निर्मितीसाठी उपयोग करून घेतला आहे. चित्रनगरीची स्थापना महाराष्ट्र राज्याने चित्रपट उद्योगास पायाभूत सुविधा व सवलती देण्यासाठी केली आहे.भारतीय चित्रपट उद्योगाचे जनक श्री.दादासाहेब फाळके यांच्या स्मरणार्थ चित्रनगरीचे नामांकरण दादासाहेब फाळके चित्रनगरी असे करण्यात आले आहे.  

लक्षावधी कोटींची गुंतवणूक करून आम्ही चित्रीकरणासाठी अनेक हेक्टर्सच्या हिरवीगार जमिनीवर ४० पेक्षा जास्त बाह्य चित्रीकरण स्थळे  निर्माण केली आहेत.

या शिवाय एक लक्ष चौ.फु.क्षेत्रफळ हे अद्ययावत,ध्वनीविरोधक वातानुकुलीत  कलागारे यांनी व्यापले असून येथे उर्जा,पाणी, कुशल मदतनीस वर्ग,खानपान व आदरतिथ्याने सजलेले  आहे

यासाठी मोजावी लागणारी किंमत ही आंतरराष्ट्रीय दरांपेक्षा केवळ एक पंचमांश आहे ज्यायोगे निर्मितीमुल्यांचा र्हास न होता निर्मिती करणे शक्य होते. 

आपल्या निर्मिती गटाचे दादासाहेब फाळके चित्रनगरीत हार्दिक स्वागत.आपल्या  चित्रीकरणासाठी चित्रनगरीतील सुविधांची पडताळणी  आपण करू शकता.